भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामचि हें आहे पंचतत्त्वा ठाव । नाहीं दुजा भाव देखावया

namachi hen ahe panchatattva thav | nahin duja bhav dekhavaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामचि हें आहे पंचतत्त्वा ठाव । नाहीं दुजा भाव देखावया ॥१॥ देखणारा जाहाल कर्पुराची वाती । नामाग्निं विश्रांती ठाई जाहाली ॥२॥ द्वैताद्वैत तेथें नेणे जाणपण । गेलें हरपोन नामें सर्व ॥३॥ नामदेव म्हणे अनाम तें नाम । नाना नामभ्रम तेथें दुजा ॥४॥