भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे

nam hmanavaya tun kanre karanta | kay tujhe adrushtan li-hilen ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे ॥१॥ यमाचे यमपाश पडतील गळां । जाशील सगळा काळामुखीं ॥२॥ शरीराची आशा बाळ हें तारुण्य । अवचित वृद्धपण येईल मूढा ॥३॥ लक्ष्मी धन मद पुत्र स्त्री घरदार । नेतां यमर्किकर न सोडिती ॥४॥ मायबाप सखी न येती सांगातें । जंव शरीरीं पुरतें बळ आहे ॥५॥ न येती सांगातें सज्जन सोयरीं । वानप्रस्थ ब्रह्मचारी श्रेष्ठ झाले ॥६॥ घेशील तूं सोंग संन्यास आश्रम । सांडोनि घराश्रम न सुटसी ॥७॥ नामा ह्मणे नाम नित्य नरहरी । म्हणतां श्रीहरी तरशील ॥८॥