भजनी मालिका

भजने

देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥ सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देह नाशिवंत अभ्राची साउली । तैशी परी बोली संसाराची ॥१॥ जळगारीं जैसें उदक नाथिलें । कां मृगजळ पसरलें चहुंकडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥ मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देह पाहतां दोषाची दिठी । वृत्ती दिसे तैं स्वरुपीं मिठीं ॥१॥ कैसेनी हरिदास भासती । देही असे तंव दोष दिसती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

देह मंदिराभीतरीं । शेजे सूदला श्रीहरी । निद्रा उन्मनीचे भरी । तें म्यां स्वप्न देखिलें ॥१॥ स्वप्नीं भुललें बाई । मागील नाठवेचि कांहीं । हा जीव परवस्तूच्या ठायीं । तनुमने आटला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देह सांडावा न मांडावा । येणें परमार्थुची साधावा ॥१॥ जेणें देहीं वाढें भावो । देहीं दिसतसे देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देह हा काळाचा जाणार शेवटीं । याची धरुनी मिठी गोडी काय ॥१॥ जाणार जाणार जाणार हें विश्व । वाउगाचि सोस करसी काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देह हा सादर पाहावा निश्चित । सर्व सुख एथें नाम आहे ॥१॥ ब्रम्ह जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम