भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह हे पंढरी आत्मा पांडुरंग

deh he pandhari atma pandurang

रचनाकार: संत बोधले · अभंग
देह हे पंढरी आत्मा पांडुरंग । नित्य करी संग अहर्निशी ॥१॥ चहु देहाची करुनिया वीट । त्यावरी उभा नीट पांडुरंग ॥२॥ मन पुंडलिक आवरोनी धरा । होईल सोयरा पांडुरंग ॥३॥ बोधला म्हणे माझ्या संचिताचा रेखा । जोडियला सखा पांडुरंग ॥४॥