भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी

deh nirase tari | bolavaya nure uri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥१॥ येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥ काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त ओढे ॥२॥ विष्णुदास तुका । पूर्व धनी जाणे चुका॥३॥