भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें

deh buddhivegalen jen akaralen | nirgun ten sagunapanen ubhen kelen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥ उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥ चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥