भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार

deh tanv ahe prarabdha adhin | yacha mi kan sin vahun bhar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥१॥ सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥ लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥२॥ तुका म्हणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥३॥