भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह प्रारब्धा शिरीं । असोनि करी उद्वेग

deh prarabdha shirin | asoni kari udveg

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह प्रारब्धा शिरीं । असोनि करी उद्वेग ॥१॥ धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥ ऐसी चुकोनियां वर्में । पीडा भ्रमें पावलों ॥२॥ तुका म्हणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा ॥३॥