भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी

deh bhogitase mukhya godi | stri bhogato avadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी ॥१॥ स्त्री हातीं देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥ जें जें आणि तें तें थोडें । धनधान्य आवडें कुडें ॥३॥ ऐसा भुलला संसारा । लक्ष चौर्‍यांयशीं वेरझारा ॥४॥ सोडविता नाहीं कोण्ही । एका जनार्दनावांचुनी ॥५॥