भजनी मालिका

भजने

जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥ कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाय फाकोनियां निवडोनी गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जाय बरोबरी नामया तूं जाय न चले उपाय कांहीं येथें ॥१॥ करूं काय मज पडिलें सांकडें । उल्लंघेना भीड मज याची ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥ तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाये जाये जाये परतोनी पाहे । लाजावला जीव पर न लगे सोय गे माय ॥१॥ नावेक विठ्ठल पाहूं द्या साजणी । न पुरे गे धणी डोळियांची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जारण मारण स्तंभन मोहन । वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥ येणेंचि मिरविती जगीं । अशुचि अनुरागीं निरंतर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा ॥१॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जालासी हरिभक्त तरी आम्हां काय । आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥ घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी । हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम