भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाय बरोबरी नामया तूं जाय न चले उपाय कांहीं येथें

jay barobari namaya tun jay na chale upay kanhin yethen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जाय बरोबरी नामया तूं जाय न चले उपाय कांहीं येथें ॥१॥ करूं काय मज पडिलें सांकडें । उल्लंघेना भीड मज याची ॥२॥ नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा। एक विज्ञापना परिसावी ||३|| कटावरी कर नाहीं ज्या देवाचे न घे मी तयाचें दरुशन ||४|| मारितांचि हाक यावें त्वां झडकरी। बरें म्हणे हरि नामयासी ||५|| निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान चांगया। जनी म्हणे तया सांगतसे ॥६॥