भजनी मालिका
← भजनांकडे परत

जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर

jayache alankar | budavuni hoti chor

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥ त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बऱ्या वोजा ॥ध्रु.॥ अभिळाषाच्या सुखें । अंतीं होती काळीं मुखें ॥२॥ तुका म्हणे चोरा । होय भूषण मातेरा ॥३॥