भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालेनि पाईकें गोसाविपण जिंके

jaleni paiken gosavipan jinke

जालेनि पाईकें गोसाविपण जिंके । परि स्वामिया सेवक साचा होय ॥ एकएकेविणें स्वामीसेवकपण । मिरविती हे खुण स्वामी जाणे ॥१॥ पाईक काय स्वामी स्वामिया काय पाईक । असतां एके एक दोन्ही नव्हती ॥२॥ स्वामीचें काज पाईकपणें वोज । करितां होय चोज पैं गा ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलासि वोळगतां । पाईका स्वामी असतां निवृत्ति ऐसा ॥३॥