भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालासी हरिभक्त तरी आम्हां काय । आंतली ती सोय न ठाऊकी

jalasi haribhakta tari amhan kay | antali ti soy na thauki

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जालासी हरिभक्त तरी आम्हां काय । आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥ घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी । हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणें ॥२॥ गुरुविण तुज नव्हेचि गा मोक्ष । होशिल मुमुक्षु साधक तूं ॥३॥ आत्मतत्त्वीं दृष्टी नाहींच पां केली । तंववरी ब्रह्मबोली बोलुनि काय ॥४॥ तुझें जरी रूप तुवां नाहीं ओळखिलें । अहंतेतें धरिलें कासयासी ॥५॥ आमुचें तूं मूळ जरी पुसतोसी । तुझें तूं अपेशी पाहुनि घेई ॥६॥ ऐक रे नामयाअ होई आत्मनिष्ठ । तरीच तूं श्रेष्ठ ज्ञानी म्हणे ॥७॥