भजनी मालिका
← भजनांकडे परत

जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना

jayachen sharir jainl kshanant | kan ha gopinath pave chi na

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥ तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥ अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥२॥ तुका म्हणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करिल माझें ॥३॥