भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश

jalon atan das | majhe todoniyan pash

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥ सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥ तुका म्हणे भय । करा जवळी तें नये ॥३॥