भजनी मालिका

भजने

कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कुंभार तो राक कांता त्याची बंका । कन्या नाम रंका तिघे जण ॥१॥ पंढरीक्षेत्रांत राहतां आनंदें । वाचे गोविंद आळविती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥ हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं । धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती । काय आहे संगतीं पाणियाची ॥१॥ मेणाची पुतळी घेतां करीं बरी । अग्निचे शेजारीं राहे कैशी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुलुप अर्गळा घालोनि कोठडिसी । घातलें धोंडयाशीं बंदीखानीं ॥१॥ गोणाई दामासेठी नव्हती तेव्हां घरीं । गेली भीमातीरीं स्नानालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुल्लाळ वंशांत गोरा कुंभार । कीर्ति चराचर भरियेलें ॥१॥ प्रतिज्ञा करुनी करकमळ तोडी । भाजनेंही घडी श्रीविठ्ठल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥ धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे ॥१॥ कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥१॥ दोघेहि बंधु अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । हे देखोनियां महावीर । मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा