भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती । काय आहे संगतीं पाणियाची

kulalache kumbh bhajalyavin mati | kay ahe sangatin paniyachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती । काय आहे संगतीं पाणियाची ॥१॥ मेणाची पुतळी घेतां करीं बरी । अग्निचे शेजारीं राहे कैशी ॥२॥ तैसा अधिरासी काय संतसंग । मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥ तें आजि नवल देखियेलें डोळां । दगड जैसा जळां वेगळेपण ॥४॥ म्हणे मुक्ताबाई जाऊं देऊं नये । ऐसें सरिसें काय भांडें करा ॥५॥