भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं

kulinchi he kuladevi | keli thavi santannin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥१॥ बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥ आणिला ही रूपा बळें । करूनि खळें हरीदासीं ॥२॥ तुका म्हणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥३॥