भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडावा

kumbh avagha ek ava | pakin ekin gu phedava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गू फेडावा ॥१॥ ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥ हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीला पाणी ॥२॥ तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥३॥