भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा

kushal guntale nishedha | vadi pravartale vada

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥२॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥३॥