भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा

kumbhapak lage tayasi bhoganen | avagha chi nene dev aisa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥१॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥ कळला हा देव तयासीच खरा । गाईं वत्सें घरा धाडी ब्रम्हा ॥३॥ ब्रम्हादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥ जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका म्हणे व्हावे संचित हें ॥५॥