भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुलालाचे कुंभ भाजल्याविण

kulalache kumbh bhajalyavin

कुलालाचे कुंभ भाजल्याविण । माती काय आहे संगती पाणियाची ॥१॥ मेणाची ती घेतां करी बरी । अनिचे शेजारी राहे कैशी ॥२॥ तैसा अधिरासी काय संतसंग । मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥ तें आजि नवल देखियेलें डोळां । दगड जैसा जळां वेगळेपण ॥४॥ म्हणे मुक्ताबाई जाऊं देऊं नये । ऐसें सरिसें काय भांडे करा ॥५॥