भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी

kulal apalya gharin bhajavi bhachari

कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी । म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥ हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं । धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥ तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥ राखायें तें ब्रीद करायें पावन । धाडा बोलावणें गोरोवाला ॥४॥ म्हणे मुक्ताबाई माजलें कीं कोरें । काकाचें उत्तर सत्य मानूं ॥५॥