भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं

kulache daivat jyachen pandharinath | hoin dasisut tyache gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुळाचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होईन दासीसुत त्याचे घरीं ॥१॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥ पंढरीस कोणी जाती वारेकरी । होईन त्यांचे घरीं पशुयाति ॥२॥ विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होईन पायतन त्याचे पायीं ॥३॥ तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥४॥ तुका म्हणे हाचि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥५॥