भजनी मालिका

भजने

कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥१॥ म्हणविल्यासाठी कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरीं प्रवेशली ॥१॥ म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडा-ळिलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥ जवळिच आहे भेऊं नका । माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥१॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती । न चलेसी युक्ती झाली पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांही चमत्कार देखती । विश्वासें तरी वाटे प्रीति ॥१॥ ऐसा विपरीत आहे भोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥१॥ द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून रक्षीधर्म पाळी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥ भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥ मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा