भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा

kanhin na magati deva | tyanchi karun dhanve seva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥१॥ हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥ होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥२॥ तुका म्हणे भक्तीभाव । तोचि देवाचा ही देव ॥३॥