भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें

kanhin janon naye pandurangavin | pavijel sin sandehanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥१॥ भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥ अळंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरीकथा ॥२॥ तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडी घडी लाहो ॥३॥