भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांही न करी रे मना। चिंती या चरणा विठोबाच्या

kanhi na kari re mana| chinti ya charana vithobachya

रचनाकार: संत सेना · अभंग
कांही न करी रे मना। चिंती या चरणा विठोबाच्या॥१॥ ठाव नाहीं कल्पनेसी । राशी सुखाची अमूप ॥१॥ पाहिलें श्रीमुख। नासे दुःख महाताप ॥३॥ होईल विसावा । सेना म्हणे सुख जिवा ॥४॥