भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही

kanhin tari abhay na mile uttar | aise kan nishthur jhalan tumhi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥ मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥ बोलोनी उत्तरें करी समाधान । ऐवढेंचि दान मज द्यावें ॥३॥ चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करी उदास माझे माये ॥४॥