भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक

kanhin cha mi navhen koniye ganvincha | ekat thayincha thayin ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥ नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥ तुका म्हणे नांमरूप नाहीं आम्हां । वेगळा या कर्मा अकर्मासी ॥४॥