भजनी मालिका

भजने

अंतरीं विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरीं फ़ार कष्ट ॥१॥ विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हां । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥ घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंतरींचा भाव दृढ धरी मना । सेवीं तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ आणिक नको कष्ट कांहीं । राममुखीं गायी सदा नेमें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥ तेथींचा आनंद ब्रम्हांडीं न समाये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंतरीचें गुज बोलूं ऐसें कांहीं । वर्ण व्यक्त नाहीं शब्द शून्य ॥ १ ॥ जयजय झनकूट जयजय झनकूट । अनुहात जंगट नाद गर्जे ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न म्हणावी ॥१॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अतिथी आलिया द्यावें अन्नदान । अर्पीं जीव प्राण परमार्थीं ॥१॥ तोचि एक नर श्रीहरिसमान । करी दुजा कोण नाहीं ऐसा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव