भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीं विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरीं फ़ार कष्ट

antarin vichar karito shrihari | sudamyache gharin फ़ar kashta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंतरीं विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरीं फ़ार कष्ट ॥१॥ विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हां । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥ जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगीं ॥३॥ एका जनार्दनीं तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचें तें ॥४॥