भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचा जाणती हेत । कृपावंत मग होती

antarincha janati het | krupavant mag hoti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंतरींचा जाणती हेत । कृपावंत मग होती ॥१॥ सर्वजाण सर्वजाण । संत निपुण ये अर्थी ॥२॥ देखोनियां आर्तिकांसी । करिती त्यांसी निजबोध ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल मंत्रीं । देती श्रोती उपदेश ॥४॥