भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींच्या सुखा नाहीं पै मर्यादा

antarinchya sukha nahin pai maryada

अंतरींच्या सुखा नाहीं पै मर्यादा । यापरि अगाधा होऊनि खोल ॥१॥ तेथें गोविंदु आवघाचि जाला । विश्व व्यापुनिया उरला असे ॥२॥ बाह्यअभ्यंतरी नाहीं आपपार । सर्व निरंतर नारायण ॥३॥ मी पण माझें न देखे दुजे । ज्ञानदेवो म्हणे ऐसें केलें निवृत्तिराजे ॥४॥