भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना

antarinchen janan | tari kan yeun dilen mana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥ तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥ नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥२॥ तुका म्हणे दिला ठाव । पायीं लागों दिला भाव ॥३॥