भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचा विस्तारु ब्रह्मीं पाल्हायिला

antarincha vistaru brahmin palhayila

अंतरींचा विस्तारु ब्रह्मीं पाल्हायिला । तेथें एक मनु सिध्द साधकु भला ॥१॥ तेणें केलें अनारिसें केलें अनारिसें । पाहों गेलें सरिसें सार पावलेंगे माये ॥२॥ तेथें ऋग्यजु:साम भुलले । तें माझ्या ठायीं फ़ुलले ब्रह्ममय ॥३॥ रखमादेविवर अंतरब्रह्मीं तरंगु जाला । ब्रह्मउदधी सामावला मज घेऊनि माये ॥४॥