भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥ आतां तुम्ही सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें ॥१॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दुष्टाचें चिंतन भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला । पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळ भेद ॥१॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देइ डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्नीशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी झालों देवा । काय जाल्याचें फळ ॥१॥ आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†ऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥ इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम