दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं
duhkhache dongar lagati sosave | aisen tanv thaven sakalansin
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
duhkhache dongar lagati sosave | aisen tanv thaven sakalansin
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥१॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
duhkhi hoti lobhen karaven ten kain | udatil gain mhaisi atan
दुःखी होती लोभें करावें तें काईं । उडतील गाईं म्हैसी आतां ॥१॥ आणीकही कांहीं होईंल अरष्टि । नायिके हा धीट सांगितलें ॥२॥
duja ainsa kon bali ahe atan | hari ya ananta pasuniya
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरी या अनंता पासूनिया ॥१॥ बळियाच्या आम्ही झालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
dujen khande tari | urala to avagha hari || apanabaheri | na lage thav dhundava
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरी ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥ इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥
dudivari dudi | chale mokali gujari
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥ ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥
dudh dahin tak pashuchen palan | tyammadhyen karan ghrutasar
दुध दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥१॥ हें चि वर्म आम्हां भाविकांचे हातीं । म्हणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥
dudhache ghagari madyacha ha bund | padiliya shuddha navhe mag
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥
dudhal gadhavi jari jali pahe | pavel te kay dhenusari
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥ध्रु.॥
dubalen sadaiva | mhane nagavel kevhan
दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥१॥ आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥
durjanacha man | sukhen karava khandan
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥१॥ लाता हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥
durjanachi gandhi vishthechiya pari | dekhoniyan duri vhaven taya
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
durjanachi jati | tyache tondin pade mati
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥ त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥
durjanachi jodi | sajjanache khentar todi
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥
durjanachen ang avaghen chi saral | narkacha kothal santavala
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नार्काचा कोथळ सांटवला ॥१॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥
durjanasi kari sahe | to hi dand he lahe
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥
durbal hen avaghen jan | narayanin vimukh
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥ सांडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥
durbala vanichya ek doni siddhi | sadaiva samadhi vishvarupin
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सिद्धी । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥१॥ काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥
durbalachen kon | aike ghaluniyan man | rahilen karan| tayavanchuni kay ten
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥१॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥
durbalache hatin sampadalen dhan | karitan jatan naye tyasi
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥१॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुम्ही आतां ॥ध्रु.॥
durbuddhahi te mana | kada nupajo narayana
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥