भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती

durjanachi jati | tyache tondin pade mati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥ त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥ उंच निंच नाहीं । तुका म्हणे खळा कांहीं ॥३॥