भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया

durjanachi gandhi vishthechiya pari | dekhoniyan duri vhaven taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥ अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्याचा ॥४॥ तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥