भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख

durbal hen avaghen jan | narayanin vimukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥ सांडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥ सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥ तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥