भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी

durjanachi jodi | sajjanache khentar todi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥१॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥ न म्हणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥२॥ तुका म्हणे भागा । आली निंदा करी मागा॥३॥