भजनी मालिका
← भजनांकडे परत

देइ डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी

dei dole bheti na dharin sankoch | na ghalin kanhin vech tujavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देइ डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्नीशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥ फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥२॥ आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥३॥ तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥