भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं

dekhanyachya tin jati | vethi varta atyantin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥१॥ जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥ पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदंतर तेवी ॥२॥ तुका म्हणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥३॥