भजनी मालिका
← भजनांकडे परत

देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां

deti gheti paraj geli | ghar khalin karuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥ धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥ अवघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥ सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरी होती ॥३॥ घराकडे पाहूं नयेसेंचि जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥ आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥