भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन

dekhilen ten dharin manen | samadhanen rahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥ भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥ बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥ तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसील ॥३॥