भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा

deun te upama | avadinen purushottama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥ पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥ आरुष हे वाणी। गोड वरूनि घेतां कानीं ॥२॥ आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥३॥