भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥ चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा ॥१॥ आम्ही भूमीवरी एक दैवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥ घरीं देवाचा अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

येथे आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि झालें ॥१॥ गाऊं नाचु टाळी वाहू गीत छंदें । डोलावूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम