भजनी मालिका
← भजनांकडे परत

येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा

yega yega panduranga | ghei uchaluni vosanga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥४॥